Sainik Ho Tumchyasathi - सैनिक हो तुमच्यासाठी Lyrics

Are you looking for Sainik Ho Tumchyasathi - सैनिक हो तुमच्यासाठी lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Sainik Ho Tumchyasathi - सैनिक हो तुमच्यासाठी sung by our favourite singer Asha Bhosle. This awesome song written by G. D. Madgulkar and directed by Dutta Davjekar.


भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी
सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी

वावरतो फिरतो आम्ही, नित्यकर्म अवघे करतो
राबतो आपुल्या क्षेत्री, चिमण्यांची पोटे भरतो
परि आठव येता तुमचा, आतडे तुटतसे पोटी
सैनिक हो तुमच्यासाठी ...

आराम विसरलो आम्ही, आळसा मुळी ना थारा
उत्तरेकडुन या इकडे, वार्तांसह येतो वारा
ऐकताच का अश्रूंची, डोळयांत होतसे दाटी
सैनिक हो तुमच्यासाठी ...

उगवला दिवस मावळतो, अंधार दाटतो रात्री
माऊली नीज फिरिवते कर अपुले थकल्या गात्री
स्वप्नात येऊनी चिंता काळजा दुखविते देठी
सैनिक हो तुमच्यासाठी ...

रक्षिता तुम्ही स्वातंत्र्या, प्राणांस घेऊनी हाती
तुमच्यास्तव अमुची लक्ष्मी, तुमच्यास्तव शेतीभाती
एकट्या शिपायासाठी, झुरतात अंतरे कोटी
सैनिक हो तुमच्यासाठी ...


Sainik Ho Tumchyasathi - सैनिक हो तुमच्यासाठी - Song Info.

Random ( )
Singer: Asha Bhosle
Music Directors: Dutta Davjekar
Lyricists: G. D. Madgulkar
 Hindi Song