Hi Vaat Vanatun Jaate - ही वाट वनातून जाते Lyrics

Are you looking for Hi Vaat Vanatun Jaate - ही वाट वनातून जाते lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Hi Vaat Vanatun Jaate - ही वाट वनातून जाते . This awesome song written by कण्हेरीची फुले (२०१२) and directed by .


ही वाट वनातून जाते...
नीरव नितांत जेथे
चालायाचे मज एकाकी...
पथ एकाकी जेथे !

स्तब्ध शांतता असेल जेथे
भय कुणाचे नसेल तेथे
इहलोकीच्या सुखचैनीचा
मंद सुवास... मनमौजीचा
झिडकारूनी ते सर्व लयाचे,
आक्रंदण त्या क्रुध्द भयाचे ...
पथ तो पाहण्या असेल जेथे
चालायाचे मज एकाकी...
पथ एकाकी जेथे !

पाणंदीतला शीतल वारा
नसेल जेथे स्वार्थी कावा..
'मी' पणाला नसेल थारा
सत्य -शांतीचा असे पहारा !
शस्त्र दुधारी केवळ शब्द
नियती स्तब्ध स्थित प्रारब्ध !
पथ तो पाहण्या असेल जेथे
चालायाचे मज एकाकी...
पथ एकाकी जेथे !

ही वाट वनातून जाते...
नीरव नितांत जेथे
चालायाचे मज एकाकी...
पथ एकाकी जेथे !


Hi Vaat Vanatun Jaate - ही वाट वनातून जाते - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: कण्हेरीची फुले (२०१२)
 Hindi Song