Tuze Geet Ganyasathi - तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे Lyrics

Are you looking for Tuze Geet Ganyasathi - तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Tuze Geet Ganyasathi - तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे sung by our favourite singer Sudheer Phadke. This awesome song written by Mangesh Padgaonkar and directed by Yeshwant deo.


तिन्ही लोक आनंदाने भरुन गाउ दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावु दे रे

शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा
रानफुले लेवुन सजल्या या हिरव्या वाटा
या सुंदर यात्रेसाठी मला जाउ दे रे

मोर केशरांचे झुलती पहाटेस दारी
झर्‍यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी
सोहळयात सौंदर्याच्या तुला पाहु दे रे

शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे
तुझे प्रेम घेउन येती गंध धुंद वारे
चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे

एक एक नक्षत्राचा दिवा लागताना
आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना
पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहु दे रे


Tuze Geet Ganyasathi - तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे - Song Info.

Random ( )
Singer: Sudheer Phadke
Music Directors: Yeshwant deo
Lyricists: Mangesh Padgaonkar
 Hindi Song