Shalu Hirava - शालू हिरवा, पाचू नि मरवा वेणी तिपेडी घाला Lyrics

Are you looking for Shalu Hirava - शालू हिरवा, पाचू नि मरवा वेणी तिपेडी घाला lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Shalu Hirava - शालू हिरवा, पाचू नि मरवा वेणी तिपेडी घाला sung by our favourite singer Usha Mangeshkar. This awesome song written by Shanta Shelke and directed by Pt. Hridaynath Mangeshkar.


शालू हिरवा, पाचू नि मरवा वेणी तिपेडी घाला
साजणी बाई येणार साजण माझा
गोर्‍या भाळी, चढवा जाळी, नवरत्नांची माला
साजणी बाई येणार साजण माझा

चूल बोळकी इवली इवली, भातुकलीचा खेळ गं
लुटूपुटीच्या संसाराची संपत आली वेळ गं
रेशिम धागे ओढीती मागे, व्याकुळ जीव हा झाला

सूर गुंफिते सनई येथे, झडे चौघडा दारी
वाजतगाजत मिरवत येईल घोडयावरुनी स्वारी
मी वरमाला घालीन त्याला, मुहूर्त जवळी आला

मंगलवेळी मंगलकाळी, डोळां का गं पाणी
साजण माझा हा पतिराजा, मी तर त्याची राणी
अंगावरल्या शेलारीला बांधिन त्याचा शेला


Shalu Hirava - शालू हिरवा, पाचू नि मरवा वेणी तिपेडी घाला - Song Info.

Random ( )
Singer: Usha Mangeshkar
Music Directors: Pt. Hridaynath Mangeshkar
Lyricists: Shanta Shelke
 Hindi Song