Majhe Gaane Ekach Majhe - माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे Lyrics

Are you looking for Majhe Gaane Ekach Majhe - माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Majhe Gaane Ekach Majhe - माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे sung by our favourite singer Lata Mangeshkar. This awesome song written by Baalkavi and directed by Pt. Hridaynath Mangeshkar.


माझे गाणे, एकच माझे नित्याचे गाणे
अक्षय गाणे, अभंग गाणे, गाणे हे गाणे

सर्व जगाचे मंगल, मंगल माझे गाणे
या विश्र्वाची एकतानता हे माझे गाणे
आशेच्या वीणेचा चढवूनी सूर भौतिकांत
हे गाणे, हे प्रियकर माझे गाणे मी गात

निरध्वनी हे, मूकगान हे, यास म्हणो कोणी
नभात हे साठवले याने दुमदुमली अवनी
सर्व धर्म हे भेद पंथ ही सर्व एक झाले
माझे, माझे विश्र्व, तार ही प्रेमाची बोले

ही मोक्षाची, स्वातंत्र्याची उन्नतीची माला
सौभाग्याची तार लागलो मी ही छेडायाला
हे नंदनवन ही स्वर्भूमी एक पहा झाली
मंगल मंगल मद्गानाची गती ही शेवटली


Majhe Gaane Ekach Majhe - माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे - Song Info.

Random ( )
Singer: Lata Mangeshkar
Music Directors: Pt. Hridaynath Mangeshkar
Lyricists: Baalkavi
 Hindi Song