Akherche Yetil Majhya - अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी Lyrics

Are you looking for Akherche Yetil Majhya - अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Akherche Yetil Majhya - अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी sung by our favourite singer Arun Datye. This awesome song written by Mangesh Padgaonkar and directed by Yeshwant Deo.


अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती

इथे सुरु होण्याआधी, संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते, डोळ्यांतील पाणी
जखम उरी होते ज्यांच्या, तेच गीत गाती

सर्व बंध तोडूनी जेव्हा नदी धुंद धावे
मीलन वा मरण पुढे, हे तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला अशी भिडे माती

गंध दूर ज्याचा, आणिक जवळ मात्र काटे
असे फुल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे
तरी गंध धुंडीत धावे जीव तुझ्यासाठी

आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी
गूज अंतरीचे कथिले तुला ह्या स्वरांनी
डोळ्यांतून माझ्यासाठी लाव दोन ज्योती


Akherche Yetil Majhya - अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी - Song Info.

Random ( )
Singer: Arun Datye
Music Directors: Yeshwant Deo
Lyricists: Mangesh Padgaonkar
 Hindi Song