Myanatun Usale Talvarichi Paat - म्यानातून उसळे तरवारीची पात Lyrics

Are you looking for Myanatun Usale Talvarichi Paat - म्यानातून उसळे तरवारीची पात lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Myanatun Usale Talvarichi Paat - म्यानातून उसळे तरवारीची पात sung by our favourite singer Lata Mangeshkar. This awesome song written by Kusumagraj and directed by Hridaynath Mangeshkar.


म्यानातून उसळे तरवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात

ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा सरसावुनि उठले शेले
रिकबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात निमिषात

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात

खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी
गदीर्त लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात

दगडावर दिसतील अजूनि तेथल्या टाचा
ओढयात तरंगे अजूनि रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनि मेघ मातीचा
अद्याप विराणी कुणी वार्‍यावर गात


Myanatun Usale Talvarichi Paat - म्यानातून उसळे तरवारीची पात - Song Info.

Random ( )
Singer: Lata Mangeshkar
Music Directors: Hridaynath Mangeshkar
Lyricists: Kusumagraj
 Hindi Song