Ushakal Hota Hota - उषःकाल होता होता, काळरात्र झाली Lyrics

Are you looking for Ushakal Hota Hota - उषःकाल होता होता, काळरात्र झाली lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Ushakal Hota Hota - उषःकाल होता होता, काळरात्र झाली sung by our favourite singer Asha Bhosle. This awesome song written by Suresh Bhat and directed by Hridaynath Mangeshkar.


उषःकाल होता होता, काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली

आम्ही चार किरणांची ही आस का धरावी
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली

तिजोर्‍यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती
आम्हावरी संसाराची उडे धूळ माती
आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेत ही ना वाली

उभा देश झाला आता एक बंदीशाला
जिथे देवकीचा पान्हा दूधाने जळाला
कसे पुण्य दुर्देवी अन पाप भाग्यशाली

धुमसतात अजुनि विझल्या चितांचे निखारे
अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली


Ushakal Hota Hota - उषःकाल होता होता, काळरात्र झाली - Song Info.

Random ( )
Singer: Asha Bhosle
Music Directors: Hridaynath Mangeshkar
Lyricists: Suresh Bhat
 Hindi Song