Ya Janmavar Ya Jagnyavar - या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे Lyrics

Are you looking for Ya Janmavar Ya Jagnyavar - या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Ya Janmavar Ya Jagnyavar - या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे sung by our favourite singer Arun Datye. This awesome song written by Mangesh Padgaonkar and directed by Yeshwant Deo.


या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे

चंचल वारा, या जलधारा, भिजली काळी माती
हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती
फुले लाजरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे

रंगांचा उघडुनिया पंखा, सांज कुणीही केली
काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे

बाळाच्या चिमण्या ओठांतून हाक बोबडी येते
वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलांनी घेते
नदीच्या काठी सजणासाठी गाणे गात झुरावे

या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती
अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी
इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्र्व तरावे


Ya Janmavar Ya Jagnyavar - या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे - Song Info.

Random ( )
Singer: Arun Datye
Music Directors: Yeshwant Deo
Lyricists: Mangesh Padgaonkar
 Hindi Song