Tarun Aahe Ratra Ajuni - तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे Lyrics

Are you looking for Tarun Aahe Ratra Ajuni - तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Tarun Aahe Ratra Ajuni - तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे sung by our favourite singer Asha Bhosle. This awesome song written by Suresh Bhat and directed by Hridaynath Mangeshkar.


तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे
एवढयातच त्या कुशीवर, तू असा वळलास का रे

अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला
अजुन मी विझले कुठे रे, हाय तू विझलास का रे

सांग ह्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू
उमलते अंगांग माझे आणि तू मिटलास का रे

बघ तुला पुसतोच आहे, पश्चिमेचा गार वारा
रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे

उसळती हृदयात माझ्या, अमृताच्या धूंद लाटा
तू किनार्‍या सारखा पण कोरडा उरलास का रे

ओठ अजुनी बंद का रे, श्वास ही मधुमंद का रे
बोल शेजेच्या फुलांवर, तू असा रुसलास का रे


Tarun Aahe Ratra Ajuni - तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे - Song Info.

Random ( )
Singer: Asha Bhosle
Music Directors: Hridaynath Mangeshkar
Lyricists: Suresh Bhat
 Hindi Song