Jogiya - Konyat Zopli Sitaar - जोगीया - कोन्यात झोपली सतार, सरला रंग Lyrics

Are you looking for Jogiya - Konyat Zopli Sitaar - जोगीया - कोन्यात झोपली सतार, सरला रंग lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Jogiya - Konyat Zopli Sitaar - जोगीया - कोन्यात झोपली सतार, सरला रंग . This awesome song written by घरकुल (१९७०) and directed by .


कोन्यात झोपली सतार, सरला रंग
पसरली पैंजणे सैल टाकुनी अंग
दूमडला गालीचा तक्के झुकले खाली
तबकात राहीले देठ, लवंगा, साली

थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठी
ते डावलुनी तू दार दडपिले पाठी
साधता विड्याचा घाट, उमटली तान
वर लवंग ठसता होसी कशी बेभान
चित्रात रेखिता चित्र बोलले ऐने
का नीर लोचनी आज तुझ्या ग मैने ?

मी देह विकुनिया मागुन घेते मोल
जगविते प्राण हे ओपुनिया अनमोल
रक्‍तात रुजविल्या भांगेच्या मी बागा
ना पवित्र देही तिळाएवढी जागा

शोधीत एकदा घटकेचा विश्राम
भांगेत पेरुनी तुळस परतला श्याम
सावळा तरुण तो खराच गं वनमाली
लाविते पान, तो निघून गेला खाली

अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव
पुसलेही नाही मी मंगल त्याचे नाव
बोलला हळू तो दबकत नवख्यावाणी
मम प्रीती आहे जडली तुजवर राणी

नीतीचा उघडिला खुला जिथे व्यापार
बावळा तिथे हा इष्का गणितो प्यार
हासून म्हणाले, दाम वाढवा थोडा
या पुन्हा पान घ्या, निघून गेला वेडा

तो हाच दिवस हो, हीच तिथी, ही रात
ही अशीच होते बसले परी रतिक्लांत
वळूनी न पाहता, कापीत अंधाराला
तो तारा तुटतो तसा खालती गेला

हा विडा घडवूनि करिते त्याचे ध्यान
त्या खुळ्या प्रीतीचा खुळाच हा सन्मान
ही तिथी पाळीते व्रतस्थ राहुनी अंगे
वर्षात एकदा असा जोगीया रंगे


Jogiya - Konyat Zopli Sitaar - जोगीया - कोन्यात झोपली सतार, सरला रंग - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: घरकुल (१९७०)
 Hindi Song