Ha Chandra Tuzyasathi - हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी Lyrics

Are you looking for Ha Chandra Tuzyasathi - हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Ha Chandra Tuzyasathi - हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी sung by our favourite singer Swapnil Bandodkar. This awesome song written by Chandrashekhar Sanekar and directed by Ajay-Atul, Album.


हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी
आरास ही तार्‍यांची गगनात तुझ्यासाठी
कैफात अशा वेळी मज याद तुझी आली, ये ना

मोहरत्या स्वप्‍नांना घेऊन ये तू
थरथरत्या स्पर्शांना घेऊन ये तू
अनुरागी, रसरंगी होऊन ये तू
नाजुकशी एक परी होऊन ये तू

वर्षाव तुझ्या तारुण्याचा रिमझिमता माझ्यावरी होऊ दे
रेशीम तुझ्या लावण्याचे चंदेरी माझ्यावरी लहरू दे
नाव तुझे माझ्या ओठावर येते
फूल जसे की फुलताना दरवळते
इतके मज कळते, अधुरा मी येथे
चांदरात ही बघ निसटून जाते
बांधिन गगनास झुला
जर देशील साथ मला, ये ना……मोहरत्या …

हे क्षण हळवे, एकांताचे, दाटलेले माझ्या किती भवताली
चाहूल तुझी घेण्यासाठी, रात्र झाली आहे मऊ मखमाली
आज तुला सारे काही सांगावे
बिलगुनिया तू मजला ते ऐकावे
होऊन कारंजे उसळे मन माझे
पाऊल का अजुनी न तुझे वाजे
जीव माझा व्याकुळला
दे आता हाक मला, ये ना……मोहरत्या …


Ha Chandra Tuzyasathi - हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी - Song Info.

Random ( )
Singer: Swapnil Bandodkar
Music Directors: Ajay-Atul, Album
Lyricists: Chandrashekhar Sanekar
 Hindi Song