Uga Ka Kalij Maze Ule - उगा का काळीज माझे उले Lyrics

Are you looking for Uga Ka Kalij Maze Ule - उगा का काळीज माझे उले lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Uga Ka Kalij Maze Ule - उगा का काळीज माझे उले . This awesome song written by गीतरामायण and directed by .


उगा का काळीज माझे उले
पाहुनी वेलीवरची फुले

कधी नव्हे ते मळले अंतर
कधी न शिवला सवतीमत्सर
आज का लतिकावैभव सले

काय मना हे भलते धाडस
तुला नावडे
हरिणी पाडस
पापणी वृथा भिजे का जले

गोवत्सांतिल पाहुन भावां
काय वाटतो तुजसी हेवा
चिडे का मौन तरी आतले

कुणी पक्षिणी पिला भरविते
दृश्य तुला ते व्याकुळ करते
काय हे विपरीत रे जाहले

स्वतः स्वतःशी कशास चोरी
वात्सल्याविण अपूर्ण नारी
कळाले सार्थक जन्मातले

मूर्त जन्मते पाषाणांतुन
कौसल्या का हीन शिळेहुन
विचारे मस्तक या व्यापिले

गगन अम्हांहूनी वृद्ध नाही का
त्यांत जन्मती किती तारका
अकारण जीवन हे वाटले


Uga Ka Kalij Maze Ule - उगा का काळीज माझे उले - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: गीतरामायण
 Hindi Song