Jara Visau Ya Valnavar - जरा विसावू या वळणावर Lyrics

Are you looking for Jara Visau Ya Valnavar - जरा विसावू या वळणावर lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Jara Visau Ya Valnavar - जरा विसावू या वळणावर . This awesome song written by तुझ्यावाचून करमेना (१९८६) and directed by .


भले बुरे जे घडून गेले
विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर

कसे कोठुनी येतो आपण
कसे नकळता जातो गुंतून
उगाच हसतो, उगाच रुसतो
क्षणात आतुर, क्षणात कातर
जरा विसावू या वळणावर

कधी ऊन तर कधी सावली
कधी चांदणे, कधी काहिली
गोड करूनिया घेतो सारे
लावुनिया प्रीतिची झालर
जरा विसावू या वळणावर

खेळ जुना हा युगायुगांचा
रोज नव्याने खेळायाचा
डाव रंगता मनासारखा
कुठली हुरहुर, कसले काहूर
जरा विसावू या वळणावर


Jara Visau Ya Valnavar - जरा विसावू या वळणावर - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: तुझ्यावाचून करमेना (१९८६)
 Hindi Song