Jethe Raghav Tethe Sita - निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता Lyrics

Are you looking for Jethe Raghav Tethe Sita - निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Jethe Raghav Tethe Sita - निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता . This awesome song written by गीतरामायण and directed by .


निरोप कसला माझा घेता
जेथे राघव तेथे सीता

ज्या मार्गे हे चरण चालती
त्या मार्गी मी त्यांच्या पुढती
वनवासाची मला न भीती
संगे आपण भाग्यविधाता

संगे असता नाथा आपण
प्रासादाहून प्रसन्न कानन
शिळेस म्हणतील जन सिंहासन
रघुकुलशेखर वरी बैसता

वनी श्वापदे क्रूर निशाचर
भय ना तयांचे मजसी तिळभर
पुढती मागे दोन धनुर्धर
चाप त्या करी, पाठीस भाता

ज्या चरणांच्या लाभासाठी
दडले होते धरणी पोटी
त्या चरणांचा विरह शेवटी
काय दिव्य हे मला सांगता

कोणासाठी सदनी राहू
का विरहाच्या उन्हांत न्हाऊ
का भरतावर छत्रे पाहू
दास्य का करू कारण नसता

का कैकयी वर मिळवी तिसरा
का अपुल्याही मनी मंथरा
का छळीता मग वृथा अंतरा
एकटीस मज का हो त्यजिता

विजनवास या आहे दैवी
ठाऊक होते मला शैशवी
सुखदुःखांकित जन्म मानवी
दुःख सुखावे प्रीती लाभता

तोडा आपण, मी न तोडिते
शतजन्मांचे अपुले नाते
वनवासासी मी ही येते
जाया पती का दोन मानिता

पतीच छाया, पतीच भूषण
पती चरणांचे अखंड पूजन
हे आर्यांचे नारीजीवन
अंतराय का त्यात आणिता

मूक राहता का हो आता
कितीदा ठेऊ चरणी माथा
असेन चुकले कुठे बोलता
असेन चुकले कधी बोलता
क्षमा करावी जानकीनाथा


Jethe Raghav Tethe Sita - निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: गीतरामायण
 Hindi Song