Aali Mazya Ghari Hi Diwali - आली माझ्या घरी ही दिवाळी Lyrics

Are you looking for Aali Mazya Ghari Hi Diwali - आली माझ्या घरी ही दिवाळी lyrics form movie Ashtavinayak ( 1979 )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Aali Mazya Ghari Hi Diwali - आली माझ्या घरी ही दिवाळी sung by our favourite singer Anuradha Paudwal. This awesome song directed by Anil - Arun.


आली माझ्या घरी ही दिवाळी
सप्तरंगात न्हाऊन आली

मंद चांदणे धुंद श्वास हा, मी तर त्यात भिजावे
जन्म जन्म रे तुझ्या संगती एकरुप मी व्हावे
प्रीत नयनी वसे, लाज गाली हसे
कोर चंद्राची खुलते भाळी
आली माझ्या घरी ही दिवाळी

पाऊल पडता घरी मुकुंदा, गोकुळ हरपून गेले
उटी लाविता अंगी देवा, सुगंध बरसत आले
हर्ष दाटे उरी, नाथ आले घरी
सूर उधळीत आली भूपाळी
आली माझ्या घरी ही दिवाळी

नक्षत्रांचा साज लेऊनी, रात्र अंगणी आली
दीप उजळले नयनी माझ्या ही तर दीपावली
संग होता हरी जाहले बावरी
मी अभिसारीका ही निराळी
आली माझ्या घरी ही दिवाळी


Aali Mazya Ghari Hi Diwali - आली माझ्या घरी ही दिवाळी - Song Info.

Ashtavinayak ( 1979 )
Singer: Anuradha Paudwal
Music Directors: Anil - Arun
Lyricists:
 Hindi Song