Vitthala, Tu Veda Kumbhar - विठ्ठला, तू वेडा कुंभार Lyrics

Are you looking for Vitthala, Tu Veda Kumbhar - विठ्ठला, तू वेडा कुंभार lyrics form movie Prapanch ( 1961 )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Vitthala, Tu Veda Kumbhar - विठ्ठला, तू वेडा कुंभार sung by our favourite singer Sudheer Phadke. This awesome song written by G. D. Madgulkar and directed by Sudheer Phadke.


फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
विठ्ठला, तू वेडा कुंभार

माती, पाणी, उजेड, वारा, तूच मिसळसी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार

घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविना ते कोणा न कळे
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार

तूच घडविसी, तूच फोडिसी, कुरवाळिसी तू, तूच ताडिसी
न कळे यातून काय जोडिसी
देसी डोळे परि निर्मिसी तयापुढे अंधार


Vitthala, Tu Veda Kumbhar - विठ्ठला, तू वेडा कुंभार - Song Info.

Prapanch ( 1961 )
Singer: Sudheer Phadke
Music Directors: Sudheer Phadke
Lyricists: G. D. Madgulkar
 Hindi Song