Chand Matala Matala - चांद मातला, मातला त्याला कशी आवरू Lyrics

Are you looking for Chand Matala Matala - चांद मातला, मातला त्याला कशी आवरू lyrics form movie Umbartha ( 1982 )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Chand Matala Matala - चांद मातला, मातला त्याला कशी आवरू sung by our favourite singer Lata Mangeshkar. This awesome song written by Vasant Bapat and directed by Hridaynath Mangeshkar.


चांद मातला, मातला त्याला कशी आवरू
अंगी वणवा चेतला, मला कशी सावरू

कशी पुनवेची निशा, चढे चांदण्यांची नशा
गेल्या हरवून दिशा, झाले खुळे पाखरू

आला समुद्र ही रंगा, त्याचा धिटाईचा दंगा
वेडया लहरीचा पिंगा बाई झाला की सुरू

गोड गारव्याचा मारा, देह शिरिशरे सारा
लाख चुंबनांचा मारा चांद लागला करू

त्याची प्रेमपिशी दिठी, लावी चंदनाची उटी
झाली अनावर मिठी, कुठे धीर मी धरू

चांद अंगणी गगनी, चांद नांदतो भुवनी
चांद अमृताचा मनी बाई लागला झरू


Chand Matala Matala - चांद मातला, मातला त्याला कशी आवरू - Song Info.

Umbartha ( 1982 )
Singer: Lata Mangeshkar
Music Directors: Hridaynath Mangeshkar
Lyricists: Vasant Bapat
 Hindi Song