Kashi Nashibane Thatta Aaj Mandali - कशी नशिबानं थट्टा आज मांडली Lyrics

Are you looking for Kashi Nashibane Thatta Aaj Mandali - कशी नशिबानं थट्टा आज मांडली lyrics form movie Pinjra ( 1972 )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Kashi Nashibane Thatta Aaj Mandali - कशी नशिबानं थट्टा आज मांडली sung by our favourite singer Sudhir Phadke - Asha Bhosle. This awesome song written by Jagdish Khebudkar and directed by Ram Kadam.


दहा दिशांनी, दहा मुखांनी, आज फोडिला टाहो
आसवांत या भिजली गाथा, श्रोते ऐका हो
माझ्या काळजाची तार आज छेडली
कशी नशिबानं थट्टा आज मांडली

गंगेवानी निर्मळ होतं असं एक गाव
सुखी समाधानी होतं रंक आणि राव
त्याची गुणगौरवानं कीर्ती वाढली
कशी नशिबानं थट्टा आज मांडली

अशा गावी होता एक भोळा भाग्यवंत
पुण्यवान म्हणती त्याला, कुणी म्हणे संत
त्याला एका मेनकेची दृष्ट लागली
कशी नशिबानं थट्टा आज मांडली

सत्वशील चारित्र्याची घालमेल झाली
गावासाठी नर्तकीला नदीपार केली
नार सूड भावनेनं उभी पेटली
कशी नशिबानं थट्टा आज मांडली

पिसाळल्या नागिणीनं थयथयाट केला
नाचगाण्यासाठी सारा गाव वेडा झाला
त्यांनी लाज, भीड, नीती सारी सोडली
कशी नशिबानं थट्टा आज मांडली

जाब विचाराया गेला, तिनं केला डाव
भोवऱ्यात शृंगाराच्या सापडली नाव
त्याच्या पतंगाची दोरी तिनं तोडली
कशी नशिबानं थट्टा आज मांडली


खुळ्या जीवा कळला नाही खोटा तिचा खेळ
तपोभंग झाला त्याचा, पुरा जाई तोल
त्याला कुत्र्यामांजराची दशा आणली
कशी नशिबानं थट्टा आज मांडली

कसं बोलू, काळीज कसं खोलू
सख्या हो सजणा जी

जन्मभरी फसगत झाली, तिचा हा तमाशा
जळूनिया गेली आता जगायची आशा
आज हुंदक्यानं भैरवी मी गाईली
अशी नशिबानं थट्टा आज मांडली

कसं बोलू, काळीज कसं खोलू
सख्या हो सजणा जी

याची देही याची डोळां पाहिले मरण
मीच माझ्या हाती देवा रचिले सरण
माझ्या कर्मसोहळ्याची यात्रा चालली
कशी नशिबानं थट्टा आज मांडली


Kashi Nashibane Thatta Aaj Mandali - कशी नशिबानं थट्टा आज मांडली - Song Info.

Pinjra ( 1972 )
Singer: Sudhir Phadke - Asha Bhosle
Music Directors: Ram Kadam
Lyricists: Jagdish Khebudkar
 Hindi Song