Asach Yava Pahatvara - असाच यावा पहाटवारा, जसा वितळतो पावा Lyrics

Are you looking for Asach Yava Pahatvara - असाच यावा पहाटवारा, जसा वितळतो पावा lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Asach Yava Pahatvara - असाच यावा पहाटवारा, जसा वितळतो पावा sung by our favourite singer Arun Date. This awesome song written by Shantaram Nandgaokar and directed by .


असाच यावा पहाटवारा, जसा वितळतो पावा
आरसपानी सूर मुलायम असाच निथळत यावा

अस्मानाला असा चढावा कैफ सात रंगांचा
मावळतीला चंद्र झुकावा जरा फिकट अंगाचा
हळव्या पानांतून मोहरत मोहक गंध फुलावा

भरून यावा कंठ खगांचा आणि फुटावे गाणे
व्हावी उन्मन कुणी कोकिळा त्यांच्या मधुर स्वराने
हुंकारातुन असा ओघळत शब्द प्रीतिचा यावा

प्रशांततेवर कुणी स्मिताची रेघ अशी रेखावी
मिठीतले क्षण दिठीत टिपण्या तू मजजवळ असावी
लाजलाजुनी असा फुलोरा वेलीवर लहरावा

झुळझुळणार्‍या निर्झरिणींची चरणगती तू घ्यावी
मला पाहण्या तुझी लोचने अशीच झुरत असावी
तव अधरांतिल मरंद माझ्या ओठांवर उतरावा


Asach Yava Pahatvara - असाच यावा पहाटवारा, जसा वितळतो पावा - Song Info.

Random ( )
Singer: Arun Date
Music Directors:
Lyricists: Shantaram Nandgaokar
 Hindi Song