Mag Majha Jeev - मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल Lyrics

Are you looking for Mag Majha Jeev - मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Mag Majha Jeev - मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल . This awesome song written by - and directed by .


मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल
अन् माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल

मी फिरेन दूर दूर, तुझिया स्वप्नांत चूर
तिकडे पाऊल तुझे उंबऱ्यात अडखळेल

विसरशील सर्व सर्व, आपुले रोमांचपर्व
पण माझे नाव तुझ्या ओठावर हुळहुळेल

सहज कधी तू घरात लावशील सांजवात
माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल

जेव्हा तू नाहशील, दर्पणात पाहशील
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल

जेव्हा रात्री कुशीत, माझे घेशील गीत
माझे तारुण्य तुझ्या गात्रांतुन गुणगुणेल

मग सुटेल मंद मंद, वासंतिक पवन धुंद
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल
अन् माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल


Mag Majha Jeev - मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: -
 Hindi Song