Sarv Sarv Visru De - सर्व सर्व विसरू दे, गुंतवू नको पुन्हा Lyrics

Are you looking for Sarv Sarv Visru De - सर्व सर्व विसरू दे, गुंतवू नको पुन्हा lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Sarv Sarv Visru De - सर्व सर्व विसरू दे, गुंतवू नको पुन्हा sung by our favourite singer Arun Date - Asha Bhosle. This awesome song written by Mangesh Padgaonkar and directed by Shrinivas khale.


सर्व सर्व विसरू दे, गुंतवू नको पुन्हा
येथ जीव जडविणे हाच होतसे गुन्हा

हे धुके, अशी हवा ही उदासता भरे
सूर सूर मिटुनिया लोपलीत पाखरे
हास हास लाडक्या श्रावणातल्या उन्हा

रात्र रात्र जागुनि वाट पाहिली कुणी
मंद होऊनी विरे अन पहाटचांदणी

स्वप्न संपुनी असे ये कठोर वंचना

काय मोर थांबतो मेघ दाटता शिरी
भान राधिके नुरे ऐकताच बासरी
बंधनात जन्मतो मुक्तीचा खरेपणा
हास हास लाडक्या श्रावणातल्या उन्हा

हाक धुंद ही तुझी अंग अंग वेढीते
होऊनी प्रवाह या बंधनात ओढिते
मी मला अजाणता गुंतले अशी पुन्हा
हास हास लाडक्या श्रावणातल्या उन्हा

धुंद धुंद गंध ये दाटुनी फुलाविना


Sarv Sarv Visru De - सर्व सर्व विसरू दे, गुंतवू नको पुन्हा - Song Info.

Random ( )
Singer: Arun Date - Asha Bhosle
Music Directors: Shrinivas khale
Lyricists: Mangesh Padgaonkar
 Hindi Song